#coronovirus:पुण्यात कोरोनाचं मृत्यूचक्र सुरुच, 24 तासात दोघांचा मृत्यू, आकडा 66 वर
पुणे : पुण्यात कोरोनाचा विखळा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. पुण्यात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आणि कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचा आकडाही वाढतो आहे. कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात कोरोनामुळे काल रात्रीपासून ते आतापर्यंत दोन पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बळींची संख्या आता 66 वर येऊन पोहोचली आहे.
पुण्यात एका 68 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत रुग्ण हा बारामतीतील रहिवासी असून त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांना 20 तारखेला दाखल करण्यात आलं होतं. किडणीचा आजार असल्याने डायलिसिससाठी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला गेल्या 20 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, अखेर आज त्यांचा मृत्यू झाला.
पुण्यात गेल्या 24 तासात दुसरा कोरोना मृत्यू हा पर्वती परिसरात झाला. येथे एका 72 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या वृद्धाचा काल (24 एप्रिल) रात्री उपचारादरम्यान झाला मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचा कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह आला.