breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#coronovirus:देवेंद्र फडणवीसांच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वैधानिक विकास मंडळांची मुदतवाढीसाठी पत्र

मुंबई: राज्य कोरोनाच्या संकटात सापडलं असताना त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा दोन पत्रे लिहिले आहेत. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी अद्यापही वैधानिक विकास मंडळांची आवश्यकता असल्याने त्याला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना आज, शुक्रवारी एकूण दोन पत्रे लिहिली. पहिले पत्र हे वैधानिक विकास मंडळांच्या मुदतवाढीची विनंती करणारे आहे, तर दुसरे पत्र लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी उद्योगांना सूट देताना आवश्यक प्रक्रियांचे सुलभीकरण करून विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याबाबत आहे.

पहिल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या राज्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत येत्या 30 एप्रिल 2020 रोजी संपत आहे. प्रादेशिक असमतोल दूर करण्यात या मंडळांची भूमिका आणि मदत अतिशय महत्त्वाची राहिली आहे. अद्यापही प्रादेशिक असमतोल दूर करण्यात 100 टक्के यश आपण गाठू शकलेलो नाही. त्यामुळे नियोजनात्मक पातळीवर अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या मंडळांना मुदतवाढ देणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित घ्यावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button