breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मदरशातील अत्याचारप्रकरणी बालहक्क आयोगाकडूनही चौकशी

 त्या सर्व मुलांची होणार वैद्यकीय तपासणी

पुणे – कात्रज-कोंढवा परिसरातील 30 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वीच झाला होता. त्याची दखल आता बाल हक्‍क आयोगानेही घेतली असून याबाबत संबंधित अल्पवयीन मुलांची चौकशीही करण्यात आली आहे.

कात्रज येथील एका मदरशामधील मुलांबाबत हा प्रकार घडल्याचा आरोप काही मुलांनी केला आहे. यातील 10 वर्षीय दोन पीडित मुले अत्याचाराला वैतागून पुणे स्टेशन येथे पळून आली होती. तेथे छोटी-मोठी कामे करुन ती जगण्यासाठी संघर्ष करत होती. यादरम्यान बालहक्क कार्यकर्ता असलेल्या फिर्यादी डॉ. यामिनी अडबे यांनी या मुलांची चौकशी केली असता पीडित दोन्ही मुलांनी ते कात्रजच्या आरके कॉलनीतील मदरशात वास्तव्यास होते. पण, पंधरा दिवसांपूर्वी तेथून पळून आल्याचे मुलांनी सांगितले. पळून आल्याचे कारण विचारतात तेथील रहिम नावाचा मौलाना रात्री मुलांसोबत अश्‍लील चाळे करत असल्याचे या मुलांनी सांगितले. त्याला तसे करू न दिल्यास शिवीगाळ करुन काठीने मारहाण करत असल्याचेही सांगितले. या प्रकारणात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या मुलांची मंगळवारी वैद्यकीय चाचणीही करण्यात येणार आहे. त्यातून त्यांच्यावर खरोखरच अत्याचार झाला आहे का, हे समजण्यास मदत होईल.

या संदर्भात शनिवारी मी बाल कल्याण समितीचे काही सदस्य तसेच जिल्हा महिला बाल कल्याण समितीचे अधिकारी अशा सर्वांनी विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा केली व सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही सुरू असून कायदेशीर मार्गाने काम सुरू आहे.
आस्मा शेख, सदस्य, बाल हक्‍क संरक्षण आयोग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button