breaking-newsक्रिडा

#Coronolockdown:कोरोनोमुळे टाेकियाे ऑलिम्पिक हाेणार रद्द; आयोजन समितीचे अध्यक्ष मोरींचे स्पष्ट संकेत

टाेकियाे. जर पुढील वर्षी टोकियाे ऑलिम्पिक नाही झाले तर स्पर्धेची तारीख वाढवण्यात येणार नाही. स्पर्धा रद्द केली जाईल हे म्हणणे आहे, टोकियाे ऑलिम्पिकच्या आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांचे. त्यांनी म्हटले की, जर ही महामारी समाप्त झाली नाही, त्यावर नियंत्रण मिळवले जाऊ शकले नाही आणि त्यामुळे अडचण असल्यास ऑलिम्पिक रद्द करण्यात येईल. कोरोना व्हायरसमुळे टोकियो स्पर्धा एका वर्षासाठी यापूर्वी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढील वर्षी २३ जुलैदरम्यान होईल. त्यांनी म्हटले स्पर्धेला आणखी टाळता येऊ शकत नाही.


जपानच्या निक्कन स्पोर्ट‌्स डेलीशी मुलाखतीदरम्यान मोरीला विचारले की, जर महामारीचा धोका पुढील वर्षापर्यंत कायम राहिल्यास टोकियाे ऑलिम्पिक २०२२ पर्यंत टाळले जाऊ शकते का, त्यांनी म्हटले की, “नाही, जर असे झाले, तर स्पर्धाच रद्द केली जाईल. त्यांनी कोरोनाविरुद्ध लढाई एक अदृश्य दुश्मनाविरुद्ध युद्ध असल्याने म्हटले. मोरीने सांगितले, “यापूर्वी पहिले विश्वयुद्ध आणि दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी ऑलिम्पिक रद्द झाले होते. महामारीवर नियंत्रण मिळवले गेले, तर पुढील उन्हाळ्यात ऑलिम्पिकचे आयोजन करू. संपूण जग त्यासाठी प्रयत्न करत आहे.’


टोकियो २०२० चे प्रवक्ता मासा तकाया यांनी मोरींच्या या माहितीवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले की, अध्यक्षांचे विचार आहेत. यापूर्वी टोकियो २०२० आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, महामारीमुळे स्पर्धा पुन्हा स्थगित केल्यानंतर त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय उपलब्ध नाही. आम्ही अद्याप हा विचार करतोय की, ऑलिम्पिक पुढील वर्षी २३ जुलै आणि पॅरालिम्पिक २४ ऑगस्टदरम्यान होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button