breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडी

जळगावचे सुपुत्र बीएसएफ जवान अमित पाटील यांना वीरमरण

जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना जळगावचे सुपुत्र आणि बीएसएफचे शूर जवान अमित पाटील यांना वीरमरण आले. चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील ते रहिवासी होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

शहीद अमित पाटील हे वाकडी येथील शेतकरी साहेबराव नथू पाटील यांचे ज्येष्ठ पुत्र होते. सन २०१० मध्ये ते सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती झाले होते. सध्या जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना आठ दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या अंगावर बर्फाची लादी कोसळल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू आज (बुधवारी) सकाळी दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.जवान अमित पाटील यांच्या मृत्यूमुळे वाकडी गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहीद अमित पाटील यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून या क्षणी संपूर्ण भाजपा परिवार पाटील कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं त्यांनी ट्विटद्वारे सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button