breaking-newsमुंबई

#CoronaVirus: २४ तासांत देशात कोरोनाचे ११ हजार ५०२ नवे रुग्ण

मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घाल्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ११ हजार ५०२ नवे रुग्ण आढळले असून ३२५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. चिंताजनक म्हणजे  भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ३२ हजार ४२४ वर पोहचली आहे.  तर आता पर्यंत तब्बल ९ हजार ५२० रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे  लागले आहेत. 

दिलासादायक बातमी म्हणजे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अकडेवारीनुसार भारतात कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णाच्या तुलनेत या गंभीर आजारावर मात करणाऱ्यांची  संख्या अधिक आहे. ज्यामध्ये संपूर्ण देशात सध्या १ लाख ५३ हजार १०६ रुग्णांवर उपचार सुरू असून १ लाख ६९ हजार ७९८ रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सांगण्यानुसार, १५ जून सकाळी ९ वाजेपर्यंत तब्बल ५७ लाख ७४ हजार १३३ सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये १ लाख १५ हजार ५१९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button