breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एसटी आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक, एक ठार तर अकरा जखमी

कोल्हापूर |महाईन्यूज|

कोल्हापूर ते गारगोटी मार्गावर निगवे खालसा फाट्यानजीक एसटी आणि ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर अकराहून अधिकजण गंभीर जखमी झाले. कावणे ते निगवे खालसा रस्त्यावर रात्री हा अपघात झाला. दत्तात्रय तुकाराम पाटील असे मृताचे नाव आहे. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. जखमींना येथील सीपीआरमध्ये उपचारासाठी रात्री दाखल करण्यात आले.

अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. जखमीपैकी काही प्रवासी पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. अपघातामध्ये वाळवे खुर्द येथील तानवडे कुटुंबीयांतील चौघे जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांची समोरासमोरील धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एसटीचा पुढचा भाग चक्काचूर झाला आहे. गारगोटी ते कोल्हापूर या एसटीमध्ये 25 हून अधिक प्रवासी होते. ट्रॅक्टर निलगिरीच्या लाकडांनी भरला होता. या अपघातामध्ये एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन्ही वाहनांच्या धडकेमुळे एसटीमधील प्रवासांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. काही प्रवाशांच्या डोक्याला मार बसून रक्तस्त्राव झाला. हात, पायाला गंभीर इजा पोहचल्या आहेत. घटनास्थळावरील वातावरण अतिशय गंभीर होते. प्रवाशांचे विव्हळणे, मदतीसाठी हाक दिली जात होती. अपघात झाल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना घेऊन एक रुणवाहिका सीपीआरमध्ये पोहचली. त्यानंतर दोन रुग्णवाहिकांतून जखमींना उपचारासाठी आणण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button