breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: सार्क देशांना संयुक्त रणनीतीचा मोदी यांचा प्रस्ताव

नवी दिल्ली | महाईन्यूज

करोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सार्क देशांनी संयुक्त रणनीती आखण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रस्तावित केले. त्याला नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या सदस्य देशांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि करोनाचा संयुक्तपणे मुकाबला करण्यासाठी मोदी यांनी ठेवलेल्या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले.

सार्क सदस्य देशांनी जगासमोर एक उदाहरण ठेवण्याचे आवाहन करताना मोदी यांनी, रणनीती ठरविण्यासाठी सदस्य देशांच्या नेत्यांची एक व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्याचेही प्रस्तावित केले. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय राजपक्ष, मालदीवचे अध्यक्ष इब्राहीम मोहम्मद सोलीह, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांनी मोदी यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले.

आपण एकत्रितपणे जगासमोर उदाहरण ठेवू शकतो, सार्क देशांनी एकत्रित येऊन करोनाचा मुकाबला करण्यासाठी रणनीती ठरवावी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण देशवासीयांच्या आरोग्याबाबत चर्चा करू शकतो, असे मोदी म्हणाले. सरकार आणि जनता करोनाचा मुकाबला करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहेत, असे मोदी यांनी ट्विट केले. श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्ष यांनी चर्चेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे, नेपाळच्या पंतप्रधानांनी, सोलीह यांनीही प्रस्तावाचे स्वागत केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button