breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus: संपूर्ण इटलीत दुसऱ्या दिवशीही व्यवहार बंद; अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न

रोम | महाईन्यूज

कोरोना व्हायरसशी (कोविड-१९) संबंधित मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे संपूर्ण इटलीत बुधवारी दुसºया दिवशीही व्यवहार बंदच होते. सगळ्या जगात या विषाणूने दहशत निर्माण केल्यानंतर न्यूयॉर्कने या रोगाला अटकाव करण्यासाठी नॅशनल गार्ड तैनात केले आहेत. युरोप खंडात कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका बसला आहे तो इटलीला. मंगळवारपर्यंत त्याने देशात ६३१ जणांचा बळी घेतला होता. कोविड-१९ ने जगभर क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि राजकीय घटनांवर मोठाच परिणाम घडवून आणला आहे. कोविड-१९ चा उद्रेक पहिल्यांदा चीनमध्ये झाला. आता आम्ही या विषाणूवर मूलत: नियंत्रण मिळवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु जगभर याचे रुग्ण अनेक पटींनी वाढत चालले आहेत. दुकानांमध्ये याची दहशत निर्माण झाली असून, आर्थिक बाजारपेठेत अचानक काहीही घडत आहे.

मध्य अमेरिकेतील पनामात कोविड-१९ ने ६४ वर्षांच्या व्यक्तीचा पहिला बळी मंगळवारी घेतला. चीनमध्ये कोविड-१९ चे ८० हजारांपेक्षा जास्त रुग्ण असून, तेथे आणखी २२ जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या ३,१५८ वर गेल्याचे बुधवारी अधिकाºयांनी सांगितले. संपूर्ण जगात कोविड-१९ चे एक लाख १७ हजार ३३९ रुग्ण, तर १०७ देशांत ४,२५१ (चीनचे ३१५८ समाविष्ट) जण मरण पावले आहेत. इटली हे चीननंतर कोरोना व्हायरसचे जगातील दुसरे केंद्र बनू नये, यासाठी रोमने कॅफेंमध्ये पोलीस पहारा लावला आहे. दिवसा कॅफेंमध्ये ग्राहक एकमेकांपासून तीन फूट दूर असावेत, याची काळजी पोलीस घेत आहेत, तर सायंकाळी सहानंतर तर कॅफे बंदच ठेवावा लागतो आहे. चीनमध्ये मात्र दैनंदिन जीवन हळूहळू का असेना पूर्वपदावर येत आहे.कोविड-१९ ची बाधा झालेल्यांची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. चीननंतर सगळ्यात जास्त रुग्ण आज इटलीतच आहेत. सोमवारी तेथे ४६३ रुग्ण होते ते मंगळवारी ६३१ झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button