breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: श्रमिकांनी धोकादायक प्रवासाऐवजी एसटीतून सुरक्षित प्रवास करा; अनिल परब यांचे आवाहन

गेले पाच दिवस हजारो श्रमिकांना सुरक्षितपणे एसटी बसेसद्वारे राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविण्यात येत आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळ आणि राज्य परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. विशेषतः एसटी बसेस योग्यप्रकारे सॅनिटाराईज केलेल्या असून, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. त्यामुळे श्रमिकांनी अवैधरित्या व धोकादायक पद्धतीने प्रवास न करता एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button