breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

मुख्यमंत्र्यांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथील शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवारी दिनांक 14 जुन रोजी पार पडला. या कार्यक्रमाच्या स्वागतासाठी देहू गाव, पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात स्वागतासाठी फ्लेक्स उभे करण्यात आले होते. तसेच विविध सोशल मीडियात स्वागताचे डिझाईन बनवून व्हायरल करण्यात आले होते. परंतु हे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत दाखविण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर संत तुकाराम महाराजांची पगडी गळ्यात तुळशीचा मोठा हार एका हातात वीणा तर दुसऱ्या हातात चिपळ्या घेतलेला फोटो सोशल मीडियाच्या डिझाईनवर तसेच फ्लेक्सवर लावण्यात आलेला होता. देशाच्या पंतप्रधानांचे स्वागत होणे गरजेचेच आहे. परंतु तुकोबारायांच्या वेशभूषेत मोदी यांना दाखविल्याने संत तुकाराम महाराजांच्या विचारांना मानणाऱ्या वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

संत तुकाराम महाराजांनी समाजातल्या अनिष्ट प्रथा, कर्मकांड याच्यावर शब्दरूपी अभंगातून आघात केलेले आहेत. चुकीच्या प्रथा बंद होण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी सामाजिक प्रबोधन करत जनचळवळ उभारली. तुकोबारायांनी लिहिलेल्या गाथा समाजातील काही चुकीच्या लोकांनी इंद्रायणी नदीत बुडविण्याचे काम केले. परंतु तुकोबारायांचे विचार समाजातील सर्वच जाती धर्मातील लोकांपर्यंत पोचले होते. कष्टकऱ्यांना पाठांतर झालेल्या रचना पुन्हा लिहिल्या गेल्या आणि अनिष्ट प्रथा विरोधातील लढा आजही बुलंद राहिला आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराज हे सर्वच कष्टकऱ्यांचे तसेच वारकऱ्यांचे प्रेरणास्थान राहिले आहेत. अशा महान संत तुकोबारायांची जागा कोणीच घेऊ शकत नाही.

असे असताना देहू येथील कार्यक्रमात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना त्यांना तुकोबारायांच्या वेशभूषेत दाखविणे चुकीचे आहे. त्यामुळे माझ्यासह महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत दाखवणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच या पुढेही तुकोबारायांचा अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री यांना संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे यांनी निवेदन दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button