breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: वुहानमध्ये जंगली प्राण्यांच्या मांस खरेदी-विक्रीवर आणि खाण्यावर पाच वर्षांसाठी बंदी

चीन मधल्या वुहानमधून जगभरात पोहचलेल्या करोनाच्या महामारीला सुरुवात झाली. करोनाचा संसर्ग वटवाघुळामुळे झाल्याचाही अंदाज चीनमध्ये वर्तवण्यात आला आहे. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये जंगली प्राण्यांचं मांस विकण्यावर, खाण्यावर पुढील पाच वर्षांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. करोना व्हायरसचा कहर जगभरात पोहचल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

वुहान हे चीनमधलं एक शहर आहे. जे करोनाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. सर्वात आधी इथेच करोनाचे रुग्ण सापडले. त्यानंतर जगभरात करोनाचा फैलाव झाला. आत्तापर्यंत करोनामुळे जगभरात ३ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता वुहानमध्ये जंगली प्राण्यांच्या मांस खरेदी विक्रीवर आणि खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ‘सीबीएस न्यूज’ने या संदर्भातले वृत्त दिले आहेत.

करोनाचा प्रसार आणि लागण ही प्राण्यांपासून खासकरुन वटवाघळातून झाली असं सांगितलं जातं. तसंच वुहान हे वाईल्डलाईफ म्हणजेच वन्यजीव संवर्धन करणारं शहर आहे. तिथे त्यांना मारुन त्यांची मांस विक्री केली जाऊ नये असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. बुधवारपासून वन्यप्राण्यांच्या मांस खरेदी-विक्रीवर आणि खाण्यावर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button