breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी चिंचवडमध्ये विकासाऐवजी हप्तेवसुली, गुंडाप्रमाणे शहराची वाटणी करुन दोन्ही हातांनी ओरबाडून खाताहेत – अजित पवार यांची टीका

पिंपरी-चिंचवडकरांनी ‘नो वॉटर, नो व्होट’ अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर घेतली

हे सरकार पोटावर लाथ मारणारे सरकार आहे, असाही आरोप त्यांनी केला

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी परिसरात भ्रष्टाचार बोकाळला आहे. विकास कामे कशाही प्रकारे केली जात आहेत. विकास कामांऐवजी हप्ते वसुली वाढली आहे. एखाद्या गुंडाप्रमाणे शहराचे दोन भागात वाटणी करुन दोन्ही हातांनी ओरबाडून स्वतःकडे आवक कशी वाढेल, हेच पाहिले जातेय. अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, यावेळी महाआघाडीचे उमेदवार आण्णा बनसोडे, राष्ट्रवादी, काॅंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकावर घणाघाती हल्ला केला. पिंपरी-चिंचवडची एमआयडीसी एकेकाळी आशिया खंडातील एक मोठी एमआयडीसी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजकांची जननी म्हणून नावाजली गेली होती. परंतु, या सरकारच्या काळात तिची काय दुर्दशा झाली आहे. तिथले कामगार, अधिकारी आणि त्यांचं कुटुंब यांनादेखील सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे फटका बसला आहे, असा आरोप करत दसरा आणि नवरात्रातही लोकांना पाणी मिळाले नाही, इतके पिंपरी-चिंचवडचे वाईट हाल झाले आहेत. लोकांना खूप स्वप्ने दाखवून यांना सत्ता मिळवता आली. मात्र, कृतीत काहीच उतरवता आलेले नाही. आमच्या काळात ७ दिवस २४ तास पाणी या शहराला द्यायचो. पण, हा भाजप बोलघेवड्यांचा पक्ष आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला.

तत्पूर्वी, भोसरी येथे आयोजित आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही त्यांनी सरकावर हल्ला केला. पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरात भ्रष्टाचार बोकाळला आहे. कामे कशाही प्रकारे केली जात आहेत. विकासकामांऐवजी हप्तेवसुली करणाऱ्या गुंडांप्रमाणे शहराचे दोन भाग करून, दोन्ही हातांनी ओरबाडून स्वतःकडे आवक कशी वाढेल, हे पाहिले जातेय. या सगळ्यात माध्यमांचाही वेगळ्याप्रकारे वापर केला जातोय. आम्ही मात्र जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे, कारखानदारीला पूर्वीचे चांगले दिवस आणणार. उद्योगपतींना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करणार. ७५% स्थानिकांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, असा कायदा करणार. शासकीय किंवा निमशासकीय रिक्त जागा ६ महिन्यांत भरणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आत्ताच्या सरकारने, ५ वर्षांत काय कामे केली आणि नंतर काय करणार? यावर जनतेसमोर जायला हवे होते. पण, केवळ विनाकारण पवार साहेबांवर टीका करत आहेत. मध्यंतरी, पिंपरी-चिंचवडकरांनी ‘नो वॉटर, नो व्होट’ अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर घेतली होती. हे सरकार पोटावर लाथ मारणारे सरकार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button