breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवविवाहिता कोरोना पॉझिटिव्ह, नवऱ्यासह ३२ जण क्वारंटाइन

लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नववधूला करोनाची बाधा झाल्याचा अहवाल समोर आला आणि त्यामुळे तिच्या नवऱ्यासह ३२ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं. ही घटना मध्यप्रदेशातल्या भोपाळमध्ये घडली आहे. नवऱ्या मुलीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. १८ मे रोजी या मुलीचं लग्न झालं. सतलापुर येथे वास्तव्य करणाऱ्या तरुणाशी या मुलाचा विवाह झाला. आता या नवऱ्या मुलीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिच्या नवऱ्यासह ३२ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं.

नेमकं काय घडलं?
ज्या नववधूची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तिला सात दिवस आधीपासून ताप येत होता. औषध घेऊनही तिला बरं वाटलं नाही. त्यामुळे शनिवारी तिची करोना चाचणी झाली. त्यानंतर सोमवारी म्हणजेच १८ मे रोजी तिचे लग्न झाले. त्यानंतर मंगळवारी तिच्या करोना चाचणीचा अहवाल आला जो पॉझिटिव्ह आल्याचे माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींना फोन करुन सांगितले. ज्यानंतर या मुलीला तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच दोन्हीकडचे कुटुंबीय, या मुलीचा नवरा, लग्न लावणारे भटजी यांच्यासह एकूण ३२ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

मध्यप्रदेशात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ७०० च्या पुढे गेली आहे. तर आत्तापर्यंत २६७ करोना बाधितांचा मध्य प्रदेशात मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये करोनाचे ३९ रुग्ण बुधवारी आढळले आहेत. यामध्ये एका १५ दिवसांच्या बाळाचाही समावेश आहे. तर बुधवारी करोनाची बाधा होऊन एकाचा मृत्यूही झाला आहे. एकीकडे करोनाचा कहर देशभरात असताना भोपाळमध्ये अशी घटना घडल्याने प्रशासनही हादरलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button