breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus | रेल्वे मार्गावर धावणार स्पेशल पार्सल ट्रेन

मुंबई | कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, कणकवली, मडगाव आणि उड्डपी या चार स्थानकांवर या पार्सल ट्रेनमध्ये माल चढवता उतरवता येणार आहे. या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्याकरिताही करता येणार असल्याने कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.ही स्पेशल ट्रेन ओखा ते तिरुअनंतपुरम आणि पुन्हा ओखा या मार्गावर धावणार आहे. २० एप्रिलला ही ट्रेन ओखावरून रवाना होईल आणि २१ तारखेला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी, १ वाजून ४० मिनिटांनी कणकवली, ४ वाजून ५० मिनिटांनी मडगाव, तर ९ वाजून १० मिनिटांनी उड्डपी येथे पोहोचणार आहे. तर २४ एप्रिलला ही ट्रेन तिरुअनंतपुरम येथून निघून १ वाजून २० मिनिटांनी उड्डपी, ६ वाजून १० मिनिटांनी मडगाव, रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी कणकवली, तर ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button