breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: रुग्णालयाचा भोंगळ कारभार! कोरोना नेगेटिव्ह समजून पॉझिटिव्ह महिलेलाच सोडले घरी

परभणी: परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आलेला आहे. बुधवारी दुपारी रुग्णालयातून कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाऐवजी पॉझिटिव्ह रुग्णालाच घरी सोडण्यात आल्याची खळबळजनक माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे.  तीन दिवसांपूर्वी पूर्णा येथील एक कोरोनाबाधित महिलेला जिल्हा रुग्णालयात आयसोलेट करण्याचे आले होते. परंतु, अवघ्या तीन दिवसातच या महिलेला रुगणालयातून कोरोना निगेटिव्ह झालात म्हणून सुट्टी देण्यात आली होती. सदर महिला घरी पोहोचल्यानंतर तिच्या नातेवाईकांना आश्चर्य वाटले आहे. त्यांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

गंगाखेड येथील निगेटिव्ह झालेल्या आणि नावात साम्य असलेल्या एका महिलेऐवजी पूर्णा येथील पॉझिटिव्ह महिलेलाच डिस्चार्ज दिल्याची बाब उघडकीस आली. रात्री उशिरा या कोरोना पॉसिटीव्ह महिलेला रुग्णवाहिका पाठवून पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंगाखेड येथील कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच पॉझिटिव्ह महिलेला घरी पाठवल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतलेली असून तात्काळ चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने समिती नेमण्यात आलेली आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button