breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#CoronaVirus: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा उच्चांक, तब्बल 13,348 जणांना डिस्चार्ज; नवे रुग्णही वाढले

मुंबई: राज्यात काल कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा उच्चांक झालेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 13,348 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ही 3 लाख 51 हजार 710 एवढी झालेली आहे. तर नव्या रुग्णांची संख्याही वाढली असून दिवसभरात 12,248 नवीन कोरोना रुग्ण नोंद झाली आहे.

आज राज्यात 390 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68. 25 टक्के एवढे आहे. राज्यात आज 10 लाख 588 व्यक्ती घरात स्वतंत्र विलगीकरण यात आहेत तर 34 हजार 957 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण यामध्ये आहेत. राज्यात एक लाख 25 हजार 558 पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button