breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: रशिया Sputnik-V या कोविड-19 विरूद्धच्या लसीचे 100 दशलक्ष डोस भारताच्या Dr. Reddy Laboratories ला विकणार

रशिया: रशियाकडून मागील महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेली Sputnik V ही कोविड 19 विरूद्धची लस आता भारतामध्ये येण्यास सज्ज झालेली आहे. रशियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या लसीचे सुमारे 100 दशलक्ष डोस हे भारताच्या Dr. Reddy Laboratories ला दिले जाणार आहे. दरम्यान यासाठी  रेग्युलेटरी परवानगी अद्याप प्रतिक्षा आहे. ही लस कोविड 19 विरूद्ध बनवण्यात आलेली असली तरीही त्याची क्लिनिकल ट्रायल अजूनही सुरू आहे. Russian Direct Investment Fund कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतातील रेड्डी लॅबोरेटरी ही खाजगी लॅब मॉस्कोसोबत पार्टनरशिप करून त्याचे क्लिनिकल ट्रायल्स करणार आहे.

कालच रशियाच्या या कोविड 19 लसीमध्ये उत्पादनात भारत मदत करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता ही महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्युट ही जगात सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सुरूवातील अदार पुनावाला यांच्या कंपनीला या रशियाच्या लसीवर काम करण्याची संधी मिळू शकते असं वाटलेलं होतं, मात्र सध्या सीरम इंस्टिट्युट युके मधील ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीच्या उत्पादनाचं काम करत आहे. जगभरात कोविड 19 वरील लसीच्या संशोधनासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशावेळी अमेरिका, युके सारखे पाश्चात्य देश यांना मागे टाकून रशियाने कोविड 19 वर पहिली लस आणल्यानंतर अनेकांनी त्याकडे संशयाने पाहिले आहे. दरम्यान या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली नसल्याने अमेरिका आणि युके ने त्याच्या वापराला नापसंती दर्शवलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button