breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus |यवतमाळमधील मजुरांचा गुजरातहून 700 किमीचा पायी प्रवास

यवतमाळ | कोरोनाच्या संकटाने देशभरात लॉकडाऊन होताच अनेक मजुरांची तारांबळ उडाली. घरापासून दूर अडकलेल्या मजुरांनी घरी पोहोचण्यासाठी वाट्टेल ती जोखीम पत्करली. यवतमाळमधील दोन मजुरांची अशीच चित्तरकथा समोर आली आहे.

700 किलोमीटरचा खडतर प्रवास करत गुजरातमधून दोन तरुण यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात कसेबसे पोहोचले. मात्र गावात आल्यावरही त्यांना घरात प्रवेश मिळाला नाही. तर जंगलातल्या मंदिरात थांबावे लागले. तसेच आता पुढचे 14 दिवस गावच्या शाळेत क्वॉरंटाईन होऊन राहावे लागणार आहे. दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात हा प्रकार घडला आहे. सुरेश रामपुरे आणि विशाल मडावी अशी या तरुणांची नावे आहेत. दोघेही रोजगारासाठी गुजरातमध्ये गेले होते. सुरत जिल्ह्यातील नवागाव दिंडोली येथील एका रसवंतीमध्ये काम करायचे. मात्र कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली आणि रसवंतीचा रोजगार थांबला.

आता रोजगारही नाही अन् आश्रयही नाही, म्हणून या दोघांनीही गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला. परंतु गावाकडे येणार कसे सगळीकडे वाहतूक बंद.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button