breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

#CoronaVirus: मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्र्यांन कडून ठीक रात्री 12 वाजता अनोख्या शुभेच्छा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (27 जुलै) वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वयाची साठी पूर्ण केलेली आहे.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो आहे. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे.” अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आहेत.

अजितदादांनी रात्री ठीक बारा वाजता फोटो शेअर करुन मुख्यमंत्र्यांचे अभिष्टचिंतन केले आहे. या शुभेच्छा देताना अजित पवार यांनी फोटो शेअर केला आहे, दोघंही जण एकाच गाडीत बसले असतानाचा आहे. महाराष्ट्राचे स्टेअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हाती असले, तरी फोटोत मात्र गाडीचे स्टिअरिंग उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हाती दिसत आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button