breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबई

बापरे! बिल पाहून कोरोनाग्रस्त रुग्णाचा हॉस्पिटलमधूनच पळ

विरार : हॉस्पिटलचं बिल पाहून कोरोनाग्रस्त रुग्ण चक्क रुग्णालयातूनच पळून गेल्याची घटना समोर आली आहे. सव्वा लाखांपेक्षा जास्त बिल पाहून विरारमधील रुग्णाने पळ काढल्याचे बोलले जात आहे. रुग्णालयातील बिलामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला आहे. लाखाच्या वर कोव्हिड उपचाराची बिले येत असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची अवस्था बिकट झालेली आहे.

विरारच्या विजय वल्लभ या रुग्णालयात कोव्हिडचे उपचार घेणाऱ्या रुग्णाला एक लाख 30 हजार रुपयांचं बिल आलेलं होतं. रुग्णाने त्यातील 50 हजार रुपये डिपॉझिटही केले होते. रुग्ण बरा झालेला पाहून डिस्चार्ज देण्याच्या आधीच रुग्णाने रुग्णालयातूनच पळ काढला आहे. ही घटना सात दिवसा पूर्वी घडलेली आहे. याबाबत हॉस्पिटलने तक्रार दिली नसल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शेट्टे यांनी दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button