breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: मुंबई महानगर परिसरातील रुग्णांचा आकडा 100 च्या वर…

मुंबईत गेल्या काही दिवसातील सर्वात जास्त रुग्ण सोमवारी आढळलेत…मुंबई, मीरा भाईंदर, वसई-विरार, कल्याण परिसरातील मिळून तब्बल २९ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर परिसरातील रुग्णांचा आकडा 100 च्या वर गेला आहे. सोमवारी ८० वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दरम्यान, मध्य मुंबईतील वरळी कोळीवाडा आणि परिसरात गेल्या चार दिवसात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे… हजारोंच्या संख्येने लोकवस्ती असलेला दाटीवाटीचा हा गावठाण भाग पालिकेने सोमवारी अक्षरश: चहुबाजूने येण्याजण्यासाठी बंद केला. चार दिवसांपूर्वी येथे एक रुग्ण आढळला. आता येथील रुग्णसंख्या पाचवर गेली आहे. आणखी तीन संशयितांचे अहवाल यायचे आहेत. त्यामुळे एरव्ही गजबजलेला हा परिसर रविवारी मध्यरात्रीपासून अक्षरश: यंत्रणांनी ताब्यात घेतला.

शहराच्या  इतरही भागात जिथे रूग्णसंख्या जास्त आढळून येत आहे त्या ठिकाणी यंत्रणा तेथील परिसर ताब्यात घेऊन तपासणी करत आहेत. दहिसर येथील आंबावाडी, वाल्मिकी चाळ हा परिसरही पालिके ने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर के ला आहे. या ठिकाणी करोनाचे रूग्ण आढळून आल्याने येथील रहिवाशांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी दिवसभरात ४७ रुग्ण मुंबई महानगर परिसरात वाढले आहेत. या रुग्णांपैकी फक्त 1जण हा परदेश प्रवास करून आलेला होता. तर ३५ जण हे आधीच्या रुग्णांचे निकटवर्ती आहेत. तर ११ जणांना कुठून संसर्ग झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button