breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: मुंबई मधील कोरोना बाधितांचा आकडा 1,69,693 वर; आज 2,085 नव्या रुग्णांची भर, 41 जणांचा मृत्यू

मुंबई: कोरोना बाधितांच्या संख्येत अग्रस्थानी असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या मुंबई शहरात सुरुवातीपासूनच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे पाहायला मिळालेले आहे. काही दिवसांपूर्वी नव्या रुग्णांची वाढ नियंत्रणात येत असल्याचे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला लागलेली आहे.

आज मुंबई मध्ये 2,085 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडलेली असून 41 जणांचा मृत्यू झालेला आहे. या नव्या वाढीमुळे शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 1,69,693 वर पोहचला आहे. त्यापैकी 30,271 सक्रीय रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून असून 1,30,918 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. तर आतापर्यंत एकूण 8,147 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button