breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus : मुंबई-ठाण्यात थिएटरचालकांचा शासनाच्या आदेशानंतरही तिकीटविक्री सुरु

मुंबई | मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपुरातील नाट्यगृह आणि सिनेमागृहं पुढील काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतरही काही थिएटर सुरु आहेत.

कोरोनाच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सूचना जारी करण्यात आल्यानंतरही मुंबईतील काही थिएटरमध्ये तिकीट विक्री सर्रासपणे सुरु होती. सायन भागातील पीव्हीआर, ठाण्यातील सिनेमॅक्स थिएटरमध्ये शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तिकीट विक्री सुरु ठेवण्यात आली. मराठी चित्रपट निर्मात्यांनी शासनाचा आदेश प्रामाणिकपणे मानून तिकीट विक्री थांबवली. मात्र ‘अंग्रेजी मीडियम’, ‘बागी 3’ यासारख्या हिंदी सिनेमांची तिकीट विक्री सकाळच्या वेळेस सुरुच होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button