breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | मुंबईत करोनाचे दीड हजारावर रुग्ण; आतापर्यंत १०० दगावले

मुंबई | महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत करोनाची दहशत वाढत चालली आहे. मुंबईत करोनाबाधीत रुग्णसंख्येने दीड हजारचा टप्पा ओलांडला आहे. त्याचवेळी मुंबईत आतापर्यंत १०० जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने अवघी मुंबापुरी चिंताग्रस्त बनली आहे. मुंबईत आज दिवसभरात करोनाचे १५० नवीन रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल झाले आहेत. या रुग्णांसह मुंबईतील करोनाबाधीत एकूण रुग्णांची संख्या आता १५४९ इतकी झाली आहे (१०० मृत रुग्ण धरून).

त्याचवेळी मुंबईत आज आणखी ९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या १०० इतकी झाली आहे. आज मृत पावलेल्या ९ जणांपैकी ७ जणांना दीर्घकालीन आजार होते तर २ जण वयोवृद्ध होते. मुंबईसाठी काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे आज करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत आज एकाच दिवशी ४३ रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत मुंबईतील एकूण १४१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. अन्य आकडेवारीवर नजर मारल्यास मुंबईत आज करोना सदृष्य लक्षणे असलेले २५९ नवीन रुग्ण आढळले आहेत. अशा एकूण रुग्णांची संख्या आता ४७३३ इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button