breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

#CoronaVirus: माहिममधील खासगी रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द, बीएमसीची कारवाई

मुंबई : माहिममधील फॅमिली केअर रुग्णालयाची  नोंदणी एक महिन्यासाठी जी उत्तर पालिकेने रद्द केलेली आहे. कोरोनाबाधित रुग्णांकडून घेण्यात आलेले अधिक पैसे आणि एका रुग्णाच्या मृत्यूप्रकरणानंतर पालिकेने हा निर्णय घेतलेला आहे. त्यासोबत जी उत्तर पालिकेच्या कार्यालयात आतपर्यंत अनेक कोरोनामुक्त रुग्णांनी या रुग्णालयाची तक्रार केलेली होती.

या निर्णयानंतर रुग्णालयात दाखल रुग्णांची 48 तासात अन्यत्र व्यवस्था करावी किंवा त्यांना घरी पाठवावे. तसेच नव्या रुग्णांना प्रवेश देऊ नये असे आदेशही पालिकेने दिलेले आहेत. माहीममधील क्रॉस रोड क्रमांक 2, एम. एम. चोटानी मार्गावरील ‘फॅमिली केअर’ हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत सुमारे एक ते दीड हजार कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आलेले आहेत. या रुग्णालयाने आपल्याकडून उपचारासाठी सरकारी दराऐवजी अधिक पैसे घेतल्याची तक्रार कोरोनामुक्त झालेल्या काही व्यक्तींनी पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाकडे केलेली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचा कोरोना अहवाल नकारात्मक आलेला होता. तरीही त्यांच्यावर कोरोनाचे उपचार करण्यात येत होते. तसेच त्याला आवश्यक असलेले औषध आणण्यासाठी भलत्याच रुग्णाच्या नावाची चिठ्ठी देण्यात आलेली होती. रुग्णाचा मृत्यू आणि यापूर्वीच्या ‘कारणे दाखवा’ नोटीसला उत्तर न दिल्यामुळे ‘बॉम्बे नर्सिग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट 1949’अंतर्गत रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द करण्याचे आदेश पालिकेने दिलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button