breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus | महाराष्ट्रातील मृतांचा आकडा चारवर
मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रात चौथ्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत 65 वर्षीय एका कोरोनाबाधित महिलेने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट होत आहे.
पीडित महिला वाशी इथली रहिवासी होती. तिच्यावर आधी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर तिला कोरोनावरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्याने तिचे स्वॅब घेऊन ते तपासणीसामठी पाठवण्यात आले. या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट २४ मार्चला आला होता. आज अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.