TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

ईशान खट्टरने केलेलं कौतुक ऐकून करण जोहर म्हणाला, “माझ्याकडे त्या नजरेने कुणी बघतच नाही”

बॉलिवूड गॉसिपसाठी लोकप्रिय असणारा ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाचा सातवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहेत. मोठमोठ्या स्टार्सनी या नवीन सीझनमध्ये हजेरी लावली आहे. आलिया भट, विकी कौशलपासून सारा अली खान, जान्हवी कपूर, समांथा अशा सध्याच्या नवीन पिढीच्या कलाकारांनी या कार्यक्रमात यावेळीस हजेरी लावली. नुकताच या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या नव्या भागात आपल्याला कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

हॉटस्टारच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कतरिना, सिद्धांत आणि इशान हे तिघेही खूप धमाल करताना दिसत आहे. एकंदर या टीझरवरून या सगळ्याच कलाकारांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केल्याचं स्पष्ट होत आहे. ‘धडक’ या मराठमोळ्या सैराटच्या हिंदी रिमेकमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेला ईशान खट्टर हा सध्या बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

कॉफी विथ करणच्या या भागात करणने ईशानला प्रश्न विचारला की, “तुझ्यामते सर्वात सेक्सी बॅचलर कोण?” यावर ईशानने करणचं नाव घेतलं. ईशानने केलेलं हे कौतुक ऐकून करण म्हणाला की, “आजवर मला कुणीच त्या नजरेने बघितलेलं नाही.” करणच्या या प्रतिक्रियेनंतर सेटवर एकच हशा पिकला. शिवाय याच भागात ईशानचं कोणाहीबरोबर अफेअर सुरू नसल्याचं स्पष्टीकरण खुद्द सिद्धांतने दिलं. “माझ्याबरोबर राहून तोही सिंगल राहिला आहे” असं सिद्धांत गंमतीत म्हणाला.

एकूणच या कार्यक्रमाच्या येणाऱ्या भागात अशा बऱ्याच धमाल गोष्टी आणि गॉसिप अनुभवायला मिळू शकतात. ईशान खट्टर हा मध्यंतरी ‘अ सुटेबल बॉय’ या वेबसीरिजमध्ये झळकला होता. तसंच लॉकडाउन काळात त्याचा अनन्या पांडेबरोबर ‘खाली पिली’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.

आता ईशान हा कतरिना आणि सिद्धांत यांच्याबरोबर आगामी ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसणार आहे. हे तिघे प्रथमच एका चित्रपटात काम करत आहेत आणि त्याच निमित्ताने या तिघांनी कॉफी विथ करणच्या या कार्यक्रमात हजेरी लावली होती. येत्या ८ सप्टेंबर रोजी हा भाग तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button