breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज डिस्चार्ज मिळणार!

पुणे : महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज (25 मार्च) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयातून त्यांना अॅम्ब्युलन्समधून घरी सोडण्यात येईल. कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने हे दाम्पत्य आता ठणठणीत होऊन आज म्हणजेच गुढीपाडव्याला आपल्या घरी परतणार आहे.

पुण्यातील हे दाम्पत्य महाराष्ट्रातील पहिले कोविड-19 चे रुग्ण होते. दुबईहून परतलेल्या या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर होळीच्या दिवशी ते नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. चौदा दिवसांनी त्यांची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांचे नमुने पुन्हा एकदा घेण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button