breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘RSS आणि मुस्लिम ब्रदरहूड सारखेच’; राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता

RSS ही कट्टर आणि फॅसिस्टवादी संघटना आहे

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लंडनमध्ये आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी चिनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लिम ब्रदरहूड हे दोन्ही सारखेच आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना अशा पद्धतीने करण्यात आली आहे. जशा पद्धतीने करण्यात आली आहे जशा पद्धतीने इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूड स्थापन झालं होतं. लंडनमधल्या थिंक टँक चॅमथ हाऊसमध्ये सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी हे उदाहरण दिलं आहे. RSS ही कट्टर आणि फॅसिस्टवादी संघटना आहे. या संघटनेने भारतात RSS आहे. भारतात या संघटनेकडून असा प्रचार केला जातो आहे की भाजपाला कुणी हरवू शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर विश्व हिंदू परिषदेने राहुल गांधींवर टीका केली आहे. महामंत्री सुरेंद्र जैन यांनी म्हटलं आहे की, राहुल गांधी हे आपल्या स्वार्थासाठई देशाचे तुकडे करू इच्छित आहेत. राहुल गांधी यांचं वर्तन हे एखाद्या टूलकिट प्रमाणे आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राष्ट्रभक्त आहेत. त्यांची तुलना मुस्लीम ब्रदरहुडीशी करणं पूर्णपणे चुकीचं आहे, असंही सुरेंद्र जैन म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button