breaking-newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडी

#Coronavirus: बिल गेट्स यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार; म्हणाले…

करोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतातही करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेचं चक्रही पूर्णपणे थांबलं आहे. भारतात गुरुवारी करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ८० हजारांच्या जवळ गेल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे भारत पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेचं थांबलेलं चक्र सुरू करण्याची तयारी करत आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी बिल गेट्स यांनी करोनाच्या संकटामुळे जागतिक स्तरावर पडणारा  सामाजिक आणि आर्थिक ताण किमान राहिल यासंदर्भात उपाययोजना करतानाची भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचं म्हटलं आहे.

“करोनाच्या संकटामुळे जागतिक स्तरावर निर्माण होणारा सामाजिक आणि आर्थिक ताण किमान राहिल यासंदर्भात उपाययोजना करताना भारताची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तसेच भारताच्या भूमिकेमुळे लस निर्मिती, चाचणी आणि सर्वांपर्यंत उपचार पोहचण्यासाठी मार्ग सुखकर होईल,” अशी अपेक्षा बिल गेट्स यांनी व्यक्त केली. तर यापूर्वी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “करोनाची लढाई सर्वांनी एकत्र मिळून लढली पाहिजे,” असं म्हटलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button