breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: नायडू रुग्णालयातील दोन करोनाबाधितांची चाचणी १४ दिवसांनंतर निगेटिव्ह

पुण्यातील नायडू रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन करोनाबाधित रुग्णांना १४ दिवस विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आज त्यांची पुन्हा चाचणी केल्यानंतर ती निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे उद्या त्यांना घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

गायकवाड म्हणाले, “नायडू रुग्णालयात ९ मार्च रोजी जे दोन संशयित रुग्ण दाखल झाले होते, ते दोघे तपासणीमध्ये करोनाबाधित आढळले होते. या दोघांचे विलगिकरण कक्षातील आज १४ दिवस पूर्ण होत असल्याने त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यानंतर आता पुन्हा उद्या एकदा त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामध्येही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना काही सूचना देऊन घरी सोडण्यात येणार आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button