breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: धुळ्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यातील दोन करोनाबाधितांचा शुक्रवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील कोविड कक्षात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता ३१ वर पोहचली आहे. एकाच दिवसात दोन रुग्णांना जीव गमवावा लागल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. मरण पावलेल्यांमध्ये शिरपूर येथील ५८ वर्षांचा पुरूष आणि शिंदखेडा तालुक्यातील वसमाने येथील २७ वर्षांच्या तरूणाचा समावेश आहे.

जिल्ह्यात रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. गुरूवारी २९ रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ३५४ झाली आहे. नव्याने आढळलेल्या २९ रुग्णांमध्ये धुळे शहरातील १४, साक्रीतील सात, शिरपूर पाच, धुळे तालुक्यातील एक आणि शिंदखेडा तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. १६६ रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. सध्या १५७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती करोनाचे जिल्हा प्रमुख अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली.

आतापर्यंत धुळे शहरातील १४ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी धुळे शहरातील एका ३१ वर्षांच्या तरूणाचा हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात मृत्यू झाला, त्यावेळी त्याच्या नातलगांनी उपचारांविषयी प्रश्न उपस्थित करीत गोंधळ घातला होता. हिरे महाविद्यालयात उपलब्ध साधन सामग्री आणि अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारे डॉक्टर आणि परिचारिका रूग्णांवर उपचार करीत आहेत. अनेक रुग्ण बरे देखील झाले आहेत. वयोवृध्दांसह बालके तसेच डायलेसिस, उच्च रक्तदाब, मधुमेह आजार असलेल्या रुग्णांचाही समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button