breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: धक्कादायक! हिवाळ्यात कोरोनाचा मृत्यूदर हाताबाहेर जाईल, WHO ने दिला इशारा

लंडन: कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना आता जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा मोठा इशारा दिलेला आहे. युरोपसह जगाच्या अनेक भागांत हिवाळ्यात कोरोनाचा कहर आणखी वाढणार असल्याचं WHO ने म्हटलेलं आहे. हिवाळ्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणंही वाढेल असा धक्कादायक इशारा WHO ने दिलेला आहे.

हिवाळ्यामध्ये तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढेल आणि अधिक लोकांना रुग्णालयात दाखल केले जाईल आणि मृत्यूचे प्रमाण वाढेल असं युरोपमधील WHO चे प्रादेशिक संचालक हेनरी क्लग म्हणालेले आहेत. यावेळी पुढच्या काही महिन्यांसाठी 3 मुख्य कारणांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला हेनरी क्लग यांनी दिलेला आहे.

यामध्ये शाळा पुन्हा सुरू करणं, हिवाळा-थंडीचा हंगाम आणि हिवाळ्यात वृद्धांचा अधिक मृत्यू. या कारणांमुळे, संसर्गाचा धोका आणखी वाढू शकतोय. ते म्हणाले की, चेतावणी दिल्यानुसार, आताच इतर देशांनी तयारी करायला हवीये. अमेरिकेत शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्यामुळे बर्‍याच ठिकाणी संसर्ग पसरल्याचं समोर आलेलं आहे. यामुळे लोकांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सामाजिक अंतरांचे पालन करणं, मास्क वापरणं, धार्मिक स्थळांमध्ये नियमांचं पालन करणं अशा महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button