breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | देशात ७ लाख पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबई | देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा ७ लाखांच्या वर गेला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागील २४ तासात देशभरात तब्बल २२,२५२ रुग्ण सापडले आहेत. तर मागील काही दिवसात मृतांचा आकडा देखील वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, मागील २४ तासात देशात तब्बल ४६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतात आतापर्यंत एकूण २० हजारांहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ७ लाख १९ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण ७,१९,८८५ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी २०,१६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button