breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus | देशात १ सप्टेंबरपर्यंत ३५ लाख रुग्ण…

बंगळुरू | सध्याच्या राष्ट्रीय ट्रेंडकडे पाहत भारतीय विज्ञान संस्था म्हणजेच आयआयएससीने चिंता वाढवणारा अंदाज व्यक्त केला आहे. भारतात १ सप्टेंबरपर्यंत ३५ लाखांपेक्षाही जास्त करोनाबाधित रुग्ण असतील, तर एकट्या कर्नाटकात हा आकडा २.१ लाख एवढा असेल. यापैकी देशात १० लाख आणि कर्नाटकात ७१ हजार ३०० अॅक्टिव्ह केसेस असतील, असा अंदाज आयआयएससीने व्यक्त केलाय.

गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंतची सर्वाधिक उच्चांकी रुग्णसंख्या समोर आली आहे. गेल्या २४ तासात ३२ हजार ६९५ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर ६०६ जणांचा मृत्यू झाला आहे. याहून अधिक चांगली परिस्थिती म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात ४.७८ लाख अॅक्टिव्ह केसेस असणं अपेक्षित आहे. तर मार्च २०२१ अखेरपर्यंत देशात ३७.४ लाख रुग्णांपैकी १.४ लाख अॅक्टिव्ह केसेस असतील आणि १.८८ लाख मृत्यू झालेले असतील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी सर्वाधिक चिंता वाढवणारा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात ६.३ लाख एकूण केसेस आणि २.१ लाख अॅक्टिव्ह केसेस असतील, तर दिल्लीत एकूण केसेस आणि अॅक्टिव्ह केसेस अनुक्रमे २.४ लाख आणि ८१ हजार असतील, तामिळनाडूत १.६ लाख आणि ५३ हजार, तर गुजरातमध्ये अनुक्रमे १.८ लाख आणि ६१ हजार अशी ही आकडेवारी असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button