breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus|देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता आठ लाखांच्या घरात

देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 7 लाख 98 हजार 128 वर गेली आहे. तर, पुण्यात 13-23 जुलै दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. या काळात केवळ आवश्यक सेवा सुरू राहतील.

शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, देशात दररोज दोन लाखांहून अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत. एवढ्या मोठ्या देशातील ही एक मोठी कामगिरी आहे. आम्ही चाचण्यांची संख्या सतत वाढवत आहोत जेणेकरून अधिक प्रकरणे समोर येऊ शकतील.

हर्षवर्धन म्हणाले, “आतापर्यंत छोटे परिसर सोडले तर कुठेही कम्युनिटी ट्रांसमिशन झालेले नाही. ” छोट्या छोट्या भागात हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेट हा वाढत आहे. आता रिकव्हरी रेट वाढून 63% झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी आपली आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार गेल्या 24 तासांत 26 हजार 506 प्रकरणे नोंदली गेली. तर 475 लोक मरण पावले. यानंतर देशात संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 7 लाख 98 हजार 128 झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button