breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus: दहशतवाद्यांवर वॉच ठेवायची सिस्टिम वापरुन पाकिस्तान शोधतोय Covid-19 चे रुग्ण

“आयएसआयने दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी बनवलेल्या सिस्टिमचा वापर करुन आम्ही संशयित करोना रुग्णांना शोधून काढत आहोत” असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी सांगितले. आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आहे. “दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी आयएसआयने ही सिस्टिम विकसित केली होती पण आम्ही करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी या सिस्टिमचा वापर करत आहोत” असे इम्रान खान यांनी टीव्ही टेलिथॉनमध्ये बोलताना सांगितले. एका वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.

‘ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि क्वारंटाइन हाच उद्योग-व्यवसाय सुरु करण्याचा एकमेव मार्ग आहे’ असे इम्रान खान म्हणाले. पाकिस्तान करोना व्हायरसला रोखण्यासाठी TTQ मॉडेलवर काम करत आहे. या मॉडेलनुसार करोनाचे हॉटस्पॉट असलेले भाग शोधून तिथे लॉकडाउन करायचे. TTQ मध्ये करोनाला रोखण्यासाठी लष्कर नागरी यंत्रणेला सहकार्य करणार.

यामध्ये टेक्नोलॉजीचा वापर करुन रणनिती आखण्यासाठी लष्कराकडून नागरी यंत्रणेला मदत केली जाईल. TTQ सिस्टिममुळे टेस्टिंगची गती वाढणार. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोधू घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात येईल. सध्या पाकिस्तानात करोना व्हायरसचे १०,९२७ रुग्ण आहेत. त्यात २३० जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात करोना रुग्णांची संख्या कमी दिसत आहे. पण तिथे मोठया प्रमाणावर करोना चाचण्या झालेल्या नाहीत हे त्यामागे कारण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button