breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

मोठी बातमी! पुण्यातून सुटणाऱ्या १२ रेल्वे गाड्या रविवारी रद्द

पुणे : पुण्यातून सुटणाऱ्या काही रेल्वे गाड्या उद्या (रविवारी) रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाने याबाबत परिपत्रक काढत माहिती दिली आहे. त्यामुळे रविवारी सुट्टीच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्यांनी याबाबत नोंद घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुणे-लोणावळा, पुणे-तळेगाव, डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस या रेल्वे गाड्यादेखील रविवारी धावणार नाहीत.

तांत्रिक कामांमुळे पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या एकूण १२ रेल्वे गाड्या रविवारी रद्द केल्या आहेत. चिंचवड ते खडकी रेल्वे स्टेशन दरम्यान सुरू असलेल्या तांत्रिक कामांसाठी रविवारी लोकल रेल्वे गाड्या बंद असणार आहेत. पुणे स्टोशनवरून लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या १२ गाड्या तर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या १२ गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार’; विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

पुणे अप मार्गावर ‘या’ गाड्या धावणार नाहीत

पुणे – लोणावळा (वेळ ७.१५)
पुणे – तळेगांव (वेळ ७.३८)
शिवाजीनगर – लोणावळा (वेळ ८.५०)
पुणे – तळेगांव (वेळ ९.४३)
पुणे – लोणावळा (वेळ १०.४२)
पुणे – लोणावळा (वेळ १२.०२)
पुणे – लोणावळा (वेळ १५.४५)
डेक्कन एक्सप्रेस (वेळ १५.५७)
पुणे – तळेगांव (वेळ १६.३२)
कोयना एक्सप्रेस (वेळ १६.४२)
पुणे – लोणावळा (वेळ १७.१०)
शिवाजीनगर – लोणावळा (वेळ १७.५६)

पुणे डाऊन मार्गावर ‘या’ गाड्या धावणार नाहीत

लोणावळा – शिवाजीनगर (वेळ ६.५६)
तळेगांव – पुणे (वेळ ७.४८)
लोणावळा – पुणे (वेळ ७.५३)
लोणावळा – पुणे (वेळ ८.४६)
तळेगांव – पुणे (वेळ ९.५७)
डेक्कन एक्सप्रेस (वेळ १०.१०)
लोणावळा – शिवाजीनगर (वेळ १०.३१)
कोयना एक्सप्रेस (वेळ ११.३५)
लोणावळा – पुणे (वेळ १५.१६)
तळेगांव-पुणे (वेळ १६.४०)
लोणावळा – पुणे (वेळ १९.२५)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button