breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन वाढण्याची आशा

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे आजारी पडलेल्या अर्थव्यवस्थेला जीएसटी संकलनामुळे दिलासा मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे. कोरोनानंतर 8 महिन्याच्या पश्चात पहिल्यांदा ऑक्टोबरमध्ये 1 लाख कोटी रुपयांच्या वर जीएसटी संकलन पोहचण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

जीएसटीशी संबंधीत अधिकाऱयांकडून वरील माहिती देण्यात आली आहे. लॉकडाऊननंतर अनलॉकच्या कालावधीत व्यवसायाने गती पकडली असून आर्थिक व्यवहारातही बऱयापैकी वाढ दिसली आहे. त्याचप्रमाणे सध्याला उत्सवी हंगामही सकारात्मक असून जीएसटी संकलन वाढीव होण्याची आशा वर्तवली जात आहे. ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष जीएसटी कर संग्रहाचा आकडा 1 लाख कोटी पार होऊ शकतो. मागच्या वर्षाच्या तुलनेत 20 ऑक्टोबरपर्यंत 11 लाखहून अधिक जीएसटी आर – 3 बी रिटर्न भरण्यात आले आहेत. सरकारसाठी वरील उद्दिष्ट गाठले गेल्यास मोठे दिलासादायक ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button