breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: ठरलं! ‘या’ तारखेला जगाला मिळणार पुण्याची मेड इन इंडिया लस, सीरम कंपनीचा दावा

पुणे: भारतात कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या वेगानं वाढत आहे. दुसरीकडे जास्तीत जास्त टेस्टिंगवरही भर दिला जात आहे. यातच कोरोनाच्या लशीसाठी भारतीय कंपन्या ट्रायल करत असताना पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दावा केलेला आहे की, डिसेंबरपर्यंत कोरोनाला हरवणारी लस उपलब्ध होणार आहे. दोन महिन्यांत कंपनी लशीच्या किंमतीबाबत माहिती देणार आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर्श पूनावाला म्हणाले की, या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूची लस येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. ते म्हणाले की दोन महिन्यांत आम्ही या लसीची किंमत देखील जाहीर करू. अदार पूनावाला असेही म्हणाले की, अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठासमवेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कोरोना व्हायरस लस तयार करीत आहे, ज्याचे टेस्ट रिझल्ट चांगले आलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button