breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेनेला पाठिंबा दिलेले शंकरराव गडाख सध्या आहेत तरी कुठे ?

अहमदनगरः शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदार तर काही मंत्रीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेले आहेत. त्यामुळे अशाच पद्धतीने पाठिंबा दिलेले आणि मंत्रीपद मिळालेले शंकरराव गडाख सध्या कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गडाख आजारी असल्याने मुंबईतील घरीच विश्रांती घेत आहेत. मात्र, ते शिंदे यांच्या गटासोबत नसून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगण्यात येते. असे असेल तरी आजारपणामुळे सध्या ते ठाकरे यांच्याकडील बैठकांनाही जाऊ शकत नसल्याचे सांगण्यात येते.

शंकरराव गडाख नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. त्यांनी आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढविली होती. भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांचा त्यांनी पराभव केला होता. महाविकास आघाडीची स्थापना होण्यापूर्वीच त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या पुढाकारतून गडाखांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. पुढे महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. त्यामुळे या बंडोखोरीच्या पार्वभूमीवर गडाख काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे.

मात्र, अशा कसोटीच्यावेळी ते आजारी आहेत. विधानपरिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने जात असताना रस्त्यावर त्यांची गाडी स्लीप झाली. त्यामुळे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. तशाही अवस्थेत त्यांनी मतदान केले आणि थेट रुग्णालय गाठले. त्यानंतर काही वेळातच बाहेर या राजकीय घडामोडी सुरू झाल्या. तेव्हा गडाख रुग्णालयात होते. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र पुढील पंधरा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ते मुंबईतच विश्रांती घेत आहेत. ते ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आजारपणामुळे बैठकांना उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button