breaking-newsपिंपरी / चिंचवड

CoronaVirus : जीवनावश्यक वस्तू वितरकांना पोलिसांकडून मिळणार पास

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने केलेल्या मागणीची दखल घेऊन जीवनावश्यक वस्तू वितरकांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पासेस देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

पोलिस यंत्रणेकडून पासेस मिळण्याकामी परिमंडल अधिकारी -1 पोलीस उपायुक्त स्मिता पाटील व परिमंडल -2 पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, कोणतीही अडचण भासल्यास व्यापारी वर्गांनी खाली दिलेल्या पिंपरी चिंचवड शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गजानन बाबर (8600110002), गोविंद पानसरे (9422014044), विजय गुप्ता (9822448519), श्याम मेघजानी (9552263555) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना घरपोच किराणामाल,जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी तसेच गर्दी होणार नाही. याची विशेष खबरदारी आपण घेण्यात यावी. जीवनावश्यक वस्तू  घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर ठेवावे, अशा सूचना नागरिकांना द्याव्यात. जेणेकरून कोरोनासारख्या साथीचा प्रादुर्भाव होणार नाही. तसेच, पिंपरी चिंचवड शहरातील तमाम नागरिकांनी घरातच रहावे.

जीवनावश्यक वस्तू घ्यायला गेलात, तर वस्तू घेताना अंतर ठेवा, गर्दी करू नका, घरपोच  किराणामाल येईल. या सुविधेचा फायदा घ्या. त्यासाठी व्यापाऱ्यांचे संपर्क क्रमांक घ्या. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी वेळोवेळी सांगितले आहे की, अन्नधान्याचा तुटवडा महाराष्ट्रात नाही. तरी आपण शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बाबर यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button