breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus | जालन्यात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

जालना | जालना जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असतानाच काल (२ मे ) रात्री उशिरा परजिल्ह्यातून जालन्यात आलेल्या पाच संशयित रुग्णांचे अहवाल प्रयोग शाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जालना शहरासह जिल्ह्यातील जनतेत एकच खळबळ उडाली आहे. या पाच रुग्णांपैकी चार रुग्ण हे राज्य राखीव दलातील जालना येथील तुकडीतील जवान असून एक रुग्ण हा मुंबई येथून परतूर तालुक्यात परतला होता अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

जालना येथे आतापर्यंत एकून तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी दोन रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत. भोकरदन तालुक्यातील पारध येथील १७ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरुणीवर जालना येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून जालना जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच काल रात्री उशिरा प्रथमच जालना जिल्ह्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा वासियानमध्ये खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button