breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
#CoronaVirus: जगभरात २२ लाख ७५ हजारांहून अधिक बाधित
जगभरात करोनाबाधितांच्या २२ लाख ७५ हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद झाली असून, त्यापैकी जवळजवळ निम्मे रुग्ण युरोपातील आहेत. करोनाचा संसर्ग झालेल्या २२ लाख ७५ हजार ७८९ जणांपैकी १,५६,१०४ जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा सर्वाधिक फटका युरोपला बसला आहे. तेथे ११,१५,५५५ लोक करोनाबाधित असून, ९७,९८५ जण मृत्युमुखी पडले आहेत. अनेक देश केवळ अत्यंत गंभीर रुग्णांचीच चाचणी करत आहेत.