breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: जगभरात कोरोनाच्या बळींची संख्या साठ हजारांवर!

जगभरातील करोना बळींची संख्या आता साठ हजारांवर गेली असून अमेरिकेत एकाच दिवशी पंधराशे बळी गेले आहेत. जगात ११,३३,८०१ करोनाबाधित रुग्ण असून, बळींची संख्या ६०,३९८ झाली आहे. अमेरिका ७४०६, स्पेन ११,७४४, इटली १४,६८१, जर्मनी १२७५, फ्रान्स ६५०७, चीन ३३२६, इराण ३४५२ या प्रमाणे मृतांची संख्या आहे. चीनमधील करोना साथीचा सर्वोच्च कालखंड संपला असला, तरी तेथे पुन्हा दुसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. अमेरिका व युरोपात मास्कचा तुटवडा असून ते चीनवर अवलंबून आहेत.  न्यूयॉर्कमध्ये लोकांना मास्क लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकूण २,७८,००० अमेरिकी लोकांच्या चाचण्या सकारात्मक आल्या असून दर दहापैकी नऊ लोक टाळेबंदीत आहेत.

युरोपमध्ये मृतांची संख्या चाळीस हजारांवर गेली असून स्पेनमध्ये चोवीस तासांत ९०० हून अधिक बळी गेले आहेत. स्पॅनिश अ‍ॅथलिट जॅव्हीएर लारा हा करोनातून मुक्त झाला आहे. दरम्यान  स्पेनमधील करोनाचा भर ओसरला असल्याचा दावा करण्यात येत आहे. इटलीत ७६६ जण नव्याने मरण पावले असून संसर्ग चार टक्क्य़ांनी वाढला आहे.

जर्मनीत सामाजिक अंतराचे कडक निर्बंध लावण्यात आले असून नवीन संसर्ग कमी झाल्याचा दावा जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी केला आहे. अजून करोना साथीतील भीषण कालखंड बाकी असू शकतो असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी सीरिया, लिबिया, येमेन यांचा उल्लेख करून सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button