breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus: चीनमध्ये कमी रुग्ण; इटली आणि इराणमध्ये हाहाकार…

रोम | महाईन्यूज

चीनमधील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची आणि मृत्यू पावणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी इटलीमध्ये मात्र त्यात वाढ होत आहे. इटलीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २७ हजार ९८0 झाली असून, या आजाराने आतापर्यंत २१५८ जणांचा बळी घेतला आहे. जगभरातील १४५ देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि एकूण मृत्यूंची संख्या सात हजारांवर गेली आहे. या आजाराचे जगात १ लाख ८३ हजार रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली. अमेरिका, चीनसह सर्व देशांनी परदेशांतून येणाºया प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवायला सुरुवात केली आहे.

कोरोनाचा हाहाकार ऑगस्टपर्यंत सुरूच राहील, अशी भीती अमेरिकेने व्यक्त केली आहे. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत ८५ जणांचा बळी घेतला आहे आणि रुग्णांची संख्या ४५00 झाली आहे. या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण अमेरिकेत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. शाळा व महाविद्यालये तसेच विद्यापीठे बंद करण्यात आली आहेत. तसेच रेस्टॉरंट्स, बार व करमणुकीच्या कार्यक्रमांवरही सरकारने बंदी घातली आहे. इटलीमध्ये या आजारातून बरे झालेल्यांची संख्या २७४९ आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ७३ असून ४,९0७ जणांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. एकूण रुग्णांपैकी २१,२२२ जणांना कोरोनाची किरकोळ लागण झाली असून, २८५२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या पाच दिवसांपासून इटलीतील औषधांची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, कंपन्या, कार्यालये, बाजारपेठा, रेस्टॉरंट्स, बार पूर्णत: बंद आहेत.

चीनमध्ये मंगळवारी एकाच व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. मात्र परदेशांतून आलेल्या २0 जणांना लागण झाल्याचे सांगण्यात आले. चीनमध्ये आज १३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या ३२२६ झाली आहे. मात्र चीनच्या अनेक प्रांतांमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध आहे. ठराविक वेळेतच लोकांना खरेदीसाठी बाजारात जाण्याची संमती आहे. ठराविक दुकाने व मॉल काही वेळेसाठीच खुली ठेवली जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button