breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: “चीनने खरं काय ते सांगितल्यास…”; जर्मनीची चीनला विनंती

जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी सोमवारी चीनकडे एक विनंती केली. करोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात चीनने स्पष्टपणे माहिती द्यावी असं मार्केल यांनी म्हटलं आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्रिटनपाठोपाठ जर्मनीसारख्या बड्या देशाने अशी मागणी केल्याने करोनाचा संसर्ग मानवामध्ये कसा झाला यासंदर्भात माहिती उघड करण्याचा चीनवरील दबाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

मागील वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा करोनाचा प्रादुर्भाव झाला त्यावेळी चीनने यासंदर्भातील माहिती आणि त्याचा परिणाम काय झाला याबद्दलची आकडेवारी लपवल्याची शक्यता सध्या जगभरातील वेगवेगळ्या आरोग्य क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेमधील काही तज्ज्ञांनी तर या विषाणूचा प्रादुर्भाव चीनमधील वुहान येथील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेमधून झाल्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

“चीनने या विषाणूचा प्रसार कसा आणि कधी सुरु झाला याबद्दल अधिक चांगल्याप्रकारे आणि स्पष्टपणे सांगितल्यास त्याचा सर्वांना फायदा होईल असं मला वाटतं. तसेच यामधून सर्वांना धडा घेता येईल,” असं मार्केल यांनी बर्लिनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button