breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

#CoronaVirus: गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीतून संतापाची लाट; राष्ट्रवादी आंदोलन छेडणार

गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटलेली आहे. पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने आज गुरुवारी सकाळी 10 वाजता आंदोलनाची हाक दिलेली आहे. पुण्यात लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे राष्ट्रवादी आंदोलन छेडणार आहे.

“गोपीचंद पडळकर माफी मागत नाहीत, तोपर्यंत ते जातील तिथे आंदोलन करु, फक्त राष्ट्रवादीच नाही, तर महाराष्ट्राच्या आदरणीय नेत्याबद्दल त्यांनी केलेली टीका भाजपला मान्य आहे का?” असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विचारला आहे.

पडळकर काय म्हणाले?

“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

दरम्यान, शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका ही भाजपची भूमिका नाही, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button