breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

#CoronaVirus: खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोरोना विषाणूची बाधा

नांदेड: येथील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोविड-१९ची लागण झालेली आहे. मुलापाठोपाठ चिखलीकरांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांच्यावर औरंगाबाद इथे एका खासगी रुग्णालयात प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपली प्रकृती ठणठणीत असून, कोणीही चिंता करु नये, असे खासदार चिखलीकर यांनी म्हटलेले आहे.

नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आलेले होते. त्यानंतर त्यांचे वडील आणि  प्रताप पाटील चिखलीकर यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. पिता-पुत्रावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, खासदार चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण चिखलीकर यांच्यावरही औरंगाबाद इथे कोरोना विषाणू संसर्गावर उपचार सुरू होते, ते या संसर्गातून मुक्त झालेले आहेत. त्यांना आज रुग्णालयातून घरी पाठविण्यात येणार आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button